पुस्तकाचा आढावा : दुर्दम्य

गंगाधर गाडगीळ लिखित ‘दुर्दम्य’ हि कादंबरी भारताच्या एका महान स्वातंत्र्यवीराचे म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे जीवनचरित्र आहे. आयुष्यभर स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या ह्या महापुरुषाचे चरित्र वाचण्यासाठी मी फार उत्सुक होतो. तेव्हाच दुर्दम्य ह्या कादंबरी बद्दल कळले. काही दुकाने पालथी घातल्यावर मला हे पुस्तक मिळाले. पुस्तकाची २-३ पाने वाचल्यावर मला ते फार वेधक वाटले आणि मी ते लगेच विकत घेतले.

 

टिळकांच्या डेक्कन कॉलेजातील शिक्षणापासून दुर्दम्य पुस्तकाची सुरवात होते. तेथे झालेली त्यांची गोपाळ गणेश अगरकरांसोबत मैत्री व शिक्षणाबद्दल आणि राष्ट्रसेवेबद्दल त्या २ महापुरुषांची मतं सविस्तर पणे  लिहिली  आहेत. राष्ट्रप्रेमामुळे व राष्ट्रसेवेसाठी आतुर झालेल्या टिळकांनी, वासुदेव बळवंत फडक्यांकडे तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते हे मला ह्या पुस्तकात वाचल्यावर प्रथमच कळले. पुढे डेक्कन एजुकेशन सोसायटी आणि केसरी, मराठाच्या स्थापनाकरिता व त्या संस्था चालवताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करताना त्यांनी व आगरकरांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाचे वर्णन केले आहे. गणेशोत्सवाच्या स्थापनाचे वर्णन व त्या वेळेलच्या माहोलाचे वर्णन वाचताना त्या काळात असल्यासारखेच वाटते. अगरकरांशी झालेल्या भांडणानंतर केसरी व मराठा चे संपादक टिळक झाले. वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती चालू ठेवली. आपल्या नंतरच्या पिढ्यांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व राष्ट्रसेवेची इच्छा जागवली. आधी चाफेकर आणि नंतर सावरकर अशा महान स्वातंत्र्यवीरांना त्यांनी दिलेला उपदेश “तुम्ही देशसेवेसाठी अविचाराने कोणतेही साहस करू नये, पण ते जर केलेच तर मी ठाम पणे  तुमच्या पाठीशी उभा आहे ह्याची खात्री बाळगा.” वाचून त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक ‘ का म्हणतात ह्याची प्रचिती झाली.

 

पुस्तकात पुढे काँग्रेस चा उल्लेख होतो. स्वराज्य मिळवणे हेच काँग्रेस चे धोरण असावे असा टिळकांचा आग्रह होता. पण मवाळ मतांच्या पुढाऱ्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाळ अशी फूट पडली. आपल्याआपल्यातच पडलेली हि फूट आणि त्यामुळे हरवलेली एकी टिळकांना फार त्रास देत होती. हि एकी परत व्हावी ह्यासाठी टिळकांनी खूप प्रयत्न केले. वेळ अली तेव्हा तडजोडीची भूमिका घ्यायला सुद्धा तयार झाले. हे वाचल्यावर लक्षात येते कि एरवी हेकेखोर असणारे टिळक, स्वःताला व आपल्या विचारांना राष्ट्रहितापेक्षा मोठे मनात नव्हते. पुस्तकात काँग्रेसच्या प्रत्येक सभेचे उत्तम वर्णन केले गेले आहे. त्यात असेही लिहिले आहे कि इतर पुढाऱ्यांप्रमाणे टिळक, झगमगीत कपडे घालून व्यासपीठावर मिरवीत नसत तर साध्या पोशाखात आपल्या माणसांसोबत बसत. तिथूनच ते आपले विचार ठाम पणे मांडायचे. बंगालच्या फाळणी नंतर झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कटात टिळकांना गुंतवून त्यांना मंडालेला ६ वर्षांची शिक्षा झाली. वृद्ध वयात झालेल्या ह्या शिक्षेमुळे टिळकांना खूप हाल सोसावे लागले. ते हाल सहन करून त्यांनी तेव्हा गीता रहस्य लिहिले. त्यांच्या मंडालेच्या कारागृहातल्या दिवसांबद्दल वाचताना डोळ्यात पाणी येते.

 

दुर्दम्य हि कादंबरी फार सोप्या शब्दात लिहिली आहे. माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी हे पुस्तक वाचणे फार कठीण वाटले नाही. ह्या पुस्तकात, टिळकांच्या जीवनातील बारीक सारीक घटनांचा उल्लेख आहे. हे पुस्तक वाचल्यावर,  टिळक, त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार व त्यांचा त्याग नव्याने कळतो. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात टिळक व त्यांच्यासारख्या महापुरुषांचा फक्त उल्लेख होतो. शेंगांची गोष्ट व ” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे.. ” हे वाक्य सोडले तर त्या पलीकडच्या टिळकांना आपण फारसे जाणत नाही. स्वतंत्र भारतात राहून सुद्धा आपल्याला आपल्या देशावर निरपेक्ष प्रेम करता येत नाही तर त्या काळातल्या टिळकांसारख्या महापुरुषांना कसे जमले असेल असा प्रश्ण मला नेहमी पडतो. पुस्तकात टिळक व आगरकरांच्या एका संवादात शिक्षण पद्धतीवर टीका करताना टिळक म्हणतात कि ” आपल्याला दिले जाणारे शिक्षण आपल्या माणसांना निश्तेज आणि नेभळट बनवते आहे ” कदाचित हेच माझ्या प्रश्नाचे उत्तर असेल. दुर्दम्य हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवे. टिळकांचे विचार, त्यांचा त्याग समजून घेऊन ह्या स्वातंत्र्यवीराला आपल्या मनात व आपल्या कृतीतून जिवंत ठेवायला हवे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s