प्रवासवर्णन : किल्ले रायगड

‘रायगड’ कोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या या किल्ल्याची प्रस्तावना कोणत्याच महाराष्ट्रीय माणसापुढे करायची आवश्यकता नाही. रायरी नावाच्या डोंगरावर बांधलेला हा रायगड किल्ला १६७४ ते १६८९ दरम्यान मराठ्यांची राजधानी होता. १६५६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी व सभोवतालच्या प्रदेशाचा ताबा घेतला. तेव्हा पासून १४ वर्षे हा गड बांधण्यात गेली. किल्ले रायगड हिरोजी इंदाळकर ह्यांनी बांधला.  १६७४ साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर रायगड मराठ्यांची राजधानी झाला. १६८९ साली बादशाह औरंगझेब ने रायगडावर वेढा घातला. त्याच सुमारास फितुरी झाल्यामुळे संगमेश्वर जवळ संभाजी महाराज पकडले गेले. त्यामुळे रायगड किल्ला मोघलांना द्यावा लागला. १७०७ साली मराठ्यांनी रायगड पुन्हा जिंकून घेतला.

dscn6698

dscn6996

dscn6702
गड चढताना भोवतीच्या प्रदेशाचे दिसणारे दृश्य

रायगड हा निसर्गरम्य अशा कोकण प्रदेशात आहे. गड चढताना आजूबाजूच्या प्रदेशातील भारावून टाकणारी निसर्गदृश्य दिसतात. पावसाळ्यात जेव्हा ढग भव्य सह्याद्रीला टेकतात तेव्हा ते दृश्य डोळ्यात मावेनासे होते.

आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरासारखीच प्रतिमात्मक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची अशी ठिकाणं गडावर आहेत. राजदरबार, राजदरबाराचे प्रवेशद्वार, शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वराचे मंदिर, बाजारपेठ, टकमक टोक इ.

dscn6959

राजदर्बाराची पुनर्निर्मित प्रतिमा

dscn6813

राजदरबाराचे प्रवेशद्वार

dscn6845

शिवाजी महाराजांची समाधी

dscn6866

सेवेसी तत्पर हिरोजी इंदाळकर

dscn6762

dscn6871

टकमक टोक

किल्ल्यावर पोहोचायला १५०० पायऱ्या आहेत. गड चढायला २ तास लागतात. चढ फारसा कठीण नसला तरी दमवणारा आहे. पायऱ्या चढणे टाळायचे असल्यास cable car ची सोया पायथ्यापासून ते किल्ल्यापर्यंत आहे. गड  चढताना २ तलाव लागतात, पहिला तलाव हत्ती तलाव आणि दुसरा गंगासागर तलाव. गंगासागर तलाव राजमहालाच्या अगदी जवळ असल्यामुळे, महालाचे प्रतिबिंब त्यात दिसते. हे दृश्य पाहून इतिहासात फारशी रुची नसणाऱ्या व्यक्तीला देखील शहारा येईल.

dscn6774

गंगासागर तलाव व राजमहाल

रायगडापासून सर्वात जवळचे शहर महाड. महाड रायगडाच्या पायथ्यापासून (पाचाड गाव पासून) २५ किलोमीटर वर आहे. महाड ते रायगड बऱ्याच S.T च्या बसेस धावतात. महाड शहर सर्व वाहतुकीने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडले आहे. मुंबईतील परळ येथून पहिली बस सकाळी ६ वाजता आहे व शेवटची रात्री ११:३० वाजता आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी व किल्ल्यावर, राहण्याची आणि जेवणाची सोया आहे. सर्जा नावाचे हॉटेल गडावर व पायथ्याशी राहण्याची आणि जेवणाची सोया करतात. किल्ल्यावर MTDC च्या काही खोल्या आहेत.

अजून आकर्षक अशी गोष्ट म्हणजे किल्ल्यावर साजरा होणारा राज्याभिषेक सोहळा. हा सोहळा दरवर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजेच ६जून रोजी साजरा होतो.

रायगड हे एक महानतेचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील समस्यांपुढे स्फूर्ती हरवून बसलेल्या माणसांसाठी हे एक स्फूर्तिस्थान आहे.

युवकांना रायगडावर जाऊन त्याचा व महाराष्ट्राचा  इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे. मोठी साम्राज्य उभी करायला त्याग व त्यात येणाऱ्या समस्यांवर मात करायची प्रबळ इच्छाशक्ती गरजेची असते. हीच त्यागाची वृत्त्ती व इच्छाशक्ती आपल्याला आपला देश परत एकदा महान करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

dscn6917

dscn6899

टकमक टोकावरून दिसलेली दृश्ये. इथे वर फार वेगाने वाहतो. इथे येऊन बसल्यावर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत मनावरचे ताण दूर होऊन मनाला शांतात लाभते.

Advertisements

One thought on “प्रवासवर्णन : किल्ले रायगड

  1. मराठीतील वर्णन बोलके झाले आहे. दोन्ही वर्णने वाचली.अगदी मनापासून लिहिले आहे. अभिनंदन व कौतुक. असाच लिहित रहा. यात संस्थेच्या पत्रका सारखे नको त्यात तू हवास. पहिलाच प्रयत्न खूप चांगला झाला आहे. तू मराठी माध्यमात शिकला नाहीस असे वाचताना जाणवत सुध्दा नाही.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s